सारे रोजसारखेच

सारे रोजसारखेच 

रोजचीच ती सांजवेळ
रोजचेच ते देखावे
तांबूस सोनेरी किरणांमधूनी
रोजचेच थवे पाखरांचे

मंद वाहता वारा आणिक
ओठी वाफाळता चहा
रोजचाच तो सूर्यास्त
आणि रोजच्याच दिशा दहा

श्रवणीय संगीत ते रोजचेच
तीच रोजची खिडकी
तिच्या अभावी जणू भासते
निर्जन आणि बोडकी

रोज सारे रोजचेच असते
फक्त ती नसते सोबत
असतात तिच्या आठवणी फक्त
आणि विचार मनी घोळत

Post a Comment

0 Comments