ती सुरक्षित आहे का ?
तिच्या पदरी मूल नसतं म्हणून
तिला वांझोटी बोलून हिणवलं जातं
केसात गुरफटलेल्या जटांसाठी तिला
देवदासी म्हणून सोडलं जातं
कधी मंदिरात प्रवेश केला म्हणून
तिला मंदिराबाहेर हाकललं जातं
तिला वांझोटी बोलून हिणवलं जातं
केसात गुरफटलेल्या जटांसाठी तिला
देवदासी म्हणून सोडलं जातं
कधी मंदिरात प्रवेश केला म्हणून
तिला मंदिराबाहेर हाकललं जातं
पैशांच्या हव्यासापोटी तिला
देशोधडीला लावलं जातं
वंश फक्त मुलगाच वाढवतो
म्हणून गर्भात तिला मारलं जातं
आणि जन्मास जरी आली तरी
तिचं नकुशी नाव ठेवलं जातं
नकार पचवता येत नाही म्हणून
तिला विद्रूप केलं जातं
तिच्या चारित्र्याच्या वावड्या उठवून
कधी तिला बदनाम केलं जातं
हुंड्याच्या लोभापायी
तिला जिवंत जाळलं जातं
आणि पुरुषार्थ गाजवावा म्हणून
तिचं लैंगिक शोषण केलं जातं
चेटकीण,डाकिण सारख्या अंधश्रद्धेतून
तिला फासावर लटकवलं जातं
प्रेमाच्या भूलथापांना बळी पाडून
तिला देहव्यापारात ढकललं जातं
पुरुषप्रधान संस्कृतीत वारंवार
तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते
आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला
की तिला पायदळी तुडवले जाते
रोज रोज वर्तमानपत्रात
एक तरी अशी बातमी येते
आजही दुःशासन जिवंत आहे
ह्याची आठवण ती करुन देते
देशोधडीला लावलं जातं
वंश फक्त मुलगाच वाढवतो
म्हणून गर्भात तिला मारलं जातं
आणि जन्मास जरी आली तरी
तिचं नकुशी नाव ठेवलं जातं
नकार पचवता येत नाही म्हणून
तिला विद्रूप केलं जातं
तिच्या चारित्र्याच्या वावड्या उठवून
कधी तिला बदनाम केलं जातं
हुंड्याच्या लोभापायी
तिला जिवंत जाळलं जातं
आणि पुरुषार्थ गाजवावा म्हणून
तिचं लैंगिक शोषण केलं जातं
चेटकीण,डाकिण सारख्या अंधश्रद्धेतून
तिला फासावर लटकवलं जातं
प्रेमाच्या भूलथापांना बळी पाडून
तिला देहव्यापारात ढकललं जातं
पुरुषप्रधान संस्कृतीत वारंवार
तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते
आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला
की तिला पायदळी तुडवले जाते
रोज रोज वर्तमानपत्रात
एक तरी अशी बातमी येते
आजही दुःशासन जिवंत आहे
ह्याची आठवण ती करुन देते
0 Comments