अंधश्रद्धा


अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय?
आपल्या हव्यासापोटी दुसऱ्याचा बळी आणखी काय
अंधश्रद्धा म्हणजे असते फक्त भूताखेतांची पैदास
आणि याच कल्पनेने होतो माणूस उदास

असते गुप्तधन,संतानप्राप्ती याच गोष्टींची मेळी
कधी लोकांना वाटतं नशीबच खेळतंय आपल्यासोबत खेळी
अशावेळी बुआ-बाबा,तांत्रिक-मांत्रिक लागतात वेळोवेळी
महापुरुषांच्या विचारांची इथेच होते होळी

म्हणून सांगतो,अंधश्रद्धा मानू नका
देवाच्या नावाखाली काहीबाही करू नका
माणुसकीचं थोर नातं तयार करून माणूस जोडा
आणि अंधश्रद्धेला या जगापासून तोडा

दाभोळकर,पानसरे यांचेच विचार आम्ही आता आत्मसात करणार
अंधश्रद्धेसारख्या भयाण वास्तवाशी आम्ही आता दोन हात करणार
कितीही थांबले तरी आता आम्ही नाही थांबणार
भारताला आम्ही आता अंधश्रद्धामुक्त करणार